गोंदिया: शिक्षक व संस्थापकाच्या वादात सेवानिवृत्त लिपिकाचा खून

गोंदिया: शिक्षक व संस्थापकाच्या वादात सेवानिवृत्त लिपिकाचा खून

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : शाळा संचालक व शिक्षकाच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका सेवानिवृत्त लिपीकाला शिक्षकाने मारहाण केल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना आज गुरुवार (दि.१६ मे) देवरी तालुक्यातील डवकी येथे घडली. मुकुंद बागडे (६०) असे मृत सेवानिवृत्त लिपीकाचे नाव आहे. या प्रकरणी देवरी पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे.

देवरी तालुक्यातील डवकी येथील सिद्धार्थ विद्यालय येथे बुधवारी (दि.१५) संस्थेच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, संस्थेची सभा संपताच शाळेतील शिक्षक आरोपी हिरालाल खोब्रागडे (५२) यांनी अचानक येऊन शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र मेश्राम यांच्याशी शाब्दिक वाद सुरू केला. यात वादविवाद न करता सामंजस्यांनी प्रश्न मिटावेत या उद्देशाने मृत बागडे यांनी मध्यस्थी केली. मात्र, आरोपी शिक्षकाला राग अनावर झाल्याने त्याने लाकडी दांड्याने मुख्याध्यापकाला मारण्याचा प्रयत्न केला.
यावेळी मध्यस्थींसाठी आलेले सेवानिवृत्त लिपिक बागळे यांच्या डोक्यावर लाकडी दांडा लागल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, त्यांना गोंदियातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी, देवरी पोलिसांनी आरोपी शिक्षकाच्या विरोधात भादवी कलम ३०७, ३२४, ५०६, अंतर्गत गुन्हा नोंद केला. मात्र, आज, पहाटेच्या सुमारास बागडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी खुनाचा नोंद करून आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news