Nitin Gadkari : राष्ट्रीय महामार्गावरील टोलसाठी मासिक पासची सुविधा : नितीन गडकरी | पुढारी

Nitin Gadkari : राष्ट्रीय महामार्गावरील टोलसाठी मासिक पासची सुविधा : नितीन गडकरी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रीय महामार्ग शुल्क करार २००८ नुसार, गाडी मालकाने बिगर व्यावसायिक वाहन म्हणून नोंदणी केली असेल. आणि तो हे वाहन राष्ट्रीय महामार्गावरच्या विभागात प्रवासासाठी वापरत असेल. शिवाय तो कायमस्वरूपी पूल, पर्यायी रस्ता, बायपास किंवा बोगद्याचा वापर करीत असेल. तर त्याला आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी ३१५ रुपये भरून राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल प्लाझासाठी मासिक पास मिळू शकतो, अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरातून दिली आहे.

परंतु, संबंधित चालक, मालक, राष्ट्रीय महामार्गापासून २० किलोमीटर अंतराच्या परिसरात राहत असणे बंधनकारक असेल, असे देखील गडकरींकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही सवलत ज्या दिवसापासून शुल्काची रक्कम भरली आहे. तेव्हापासून एक महिन्यात जास्तीत जास्त ५० फेऱ्यांसाठी लागू असेल. यासाठी शुल्काच्या दोन तृतीयांश रक्कम भरावी लागेल. राष्ट्रीय महामार्ग शुल्क कायदा आणि संबंधित सवलत करारानुसार शुल्काच्या रकमेतील सवलत वापरकर्त्याला मासिक पासच्या स्वरूपात सुद्धा मिळू शकते, असे गडकरी (Nitin Gadkari) यांनी उत्तरातून स्पष्ट केले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button