भंडारा : उष्माघाताने दोघांचा मृत्यू | पुढारी

भंडारा : उष्माघाताने दोघांचा मृत्यू

भंडारा:पुढारी ऑनलाईन: तुमसर तालुक्यातील सुंदरटोला येथे उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली. गयावंती शेंडे (वय ५०) आणि कमल परतेती (वय ५५, दोघेही रा. सुंदरटोला) अशी मृतांची नावे आहेत.

गयावंती शेंडे आणि कमल परतेती हे दोघेही काही वर्षांपासून एकत्र सुंदरटोला येथे राहत होते. मोलमजुरी व सरपण विकून आपला उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, काही दिवसांपासून अधिक उष्णतेच्या लाटा जाणवायला सुरूवात झाली होती. याच दरम्यान दोघांनीही अन्न आणि पाणी वेळेवर मिळाले नसल्याने ते तसेच घरात झोपले होते.त्यातच त्यांच्या घरात साध्या पंख्याचीही सोय नव्हती. दरम्यान, अति उष्णतेमुळे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गोबरवाही पोलिसात नाेंद झाली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button