भीमा नदीपात्रात पाकुळखडा बुडीत बंधारा बांधा; मांडवगण फराटा येथील माजी उपसरपंचांची मागणी | पुढारी

भीमा नदीपात्रात पाकुळखडा बुडीत बंधारा बांधा; मांडवगण फराटा येथील माजी उपसरपंचांची मागणी

मांडवगण फराटा, पुढारी वृत्तसेवा: मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील मांडवगण-बाभुळसर शिवेवर भीमानदी पात्रात पाकुळखडा येथे बुडीत बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी माजी उपसरपंच संजय फराटे यांनी केली आहे.

मांडवगण फराटा येथील मांडवगण-बाभुळसर बुद्रुक परिसरात हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. या भागात दर उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होते. या भागात जवळ बंधारा नसल्याने उन्हाळ्यात पाणी टिकत नाही. परिणामी अनेक शेतकर्‍यांची पिके उन्हाळ्यात जळून जातात. तसेच भीषण पाणी टंचाईस सामोरे जावे लागते.

याबाबत बोलताना माजी उपसरपंच संजय फराटे यांनी सांगितले की, पाकुळखडा परिसरात बुडीत बंधारा व्हावा, ही अनेक वर्षांपासून आमची मागणी आहे. यासाठी सातत्याने शासन दरबारी मांडवगण फराटा, कानगाव ग्रामपंचायतीने पाठपुरावा केला आहे. माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी त्यांच्या कार्यकाळात या परिसरात स्वतः पाठपुरावा करून सर्व्हे केला होता; मात्र त्यास काही काळानंतर यश आले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची होणारी गैरसोय लक्षात घेत

वाडाच्या बाजारपेठेत रानमेवा दाखल, यंदा उत्तम बाजारभाव; आदिवासींचा होतोय मोठा फायदा

शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांनी बुडीत बंधारा करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी संजय फराटे यांनी केली आहे. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक जगताप, सोसायटीचे संचालक सुनील फराटे, बिभीषण फराटे, सोमनाथ चोथे, बाळासो वाबळे, उल्हास फराटे आदी उपस्थित होते.

Back to top button