Brinda karat : वृंदा करात यांच्या याचिकेवर साेमवारी निकाल : अनुराग ठाकूरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी | पुढारी

Brinda karat : वृंदा करात यांच्या याचिकेवर साेमवारी निकाल : अनुराग ठाकूरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याविरोधात सीपीआयएम नेत्या वृंदा करात ( Brinda karat ) यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. करात यांच्या याचिकेवर सोमवारी (दि. १३) न्यायालय निकाल सुनावणार आहे. कनिष्ठ न्यायालयाने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजप खासदार प्रवेश वर्मा यांच्याविरोधात २०२० मध्ये तथाकथितरित्या चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी करात यांची याचिका फेटाळली होती.

(Brinda karat ) न्यायमूर्ती चंद्रधारी सिंह यांच्या खंडपीठ सोमवारी यासंबंधी निकाला सुनावतील. खंडपीठाने २५ मार्च २०२२ ला सुनावणी पूर्ण करीत निकाल राखून ठेवला होता. कायद्यानुसार आवश्यक असलेल्या अपेक्षित सक्षम प्राधिकरणाची मंजूरी घेण्यात न आल्याचा दाखला देत करात यांची याचिका ऑक्टोबर २०२१ मध्ये फेटाळण्यात आली होती. न्यायालयाच्या या निर्णयाला करात यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

संबंधित दोघेही खासदार असल्याने आयपीसीच्या कलम १९६ अन्वे केंद्र सरकारच्या समक्ष प्राधिकाऱ्याची पूर्व परवानगी गुन्हा दाखल करण्यासाठी आवश्यक असल्याचे कनिष्ठ न्यायालयाने आदेशातून स्पष्ट केले होते. ठाकूर आणि वर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी संसद मार्ग पोलीस स्टेशनला निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी याचिकेतून माकपा नेत्या वृंदा करात आणि के. एम. तिवारी यांनी केली होती.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button