कोल्हापूर : नागपूर-रत्नागिरी महामार्गावर शेतकऱ्यांचे आंदोलन

कोल्हापूर : नागपूर-रत्नागिरी महामार्गावर शेतकऱ्यांचे आंदोलन

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : नागपूर-रत्नागिरी महामार्ग रस्त्याच्या सुरू असलेल्या कामातून शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या महामार्गावरून टाकून द्या. या मागणीसाठी शिये परिसरातील शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम रस्त्यावर उतरून शनिवारी (दि.1) बंद पाडले.

शिये, भुये, भुयेवाडी, जठरवाडी, निगवे दुमाला या भागातील शेतकऱ्यांच्या कुपनलिका, विहीर व नदीवरून येणाऱ्या सुमारे ३५० जलवाहिन्या आहेत. या जलवाहिन्या दक्षिणेकडून महामार्गाला छेद करून उत्तरेकडे जात आहेत. या जलवाहिनीच्या संबंधी परिसरातील शेतकऱ्यांनी व शेतकऱ्यांच्या संघटना व संस्थानी वेळोवेळी संबंधित विभागाला लेखी व तोंडी सांगितलेले आहे. तसेच तशा प्रकारची अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा झालेली आहे. संबंधित शेतकऱ्यांना जलवाहिनी रस्त्याच्या पलीकडे संबंधित विभागाकडूनच करून देणार असल्याचे सांगितले होते.

पण प्रत्यक्षात संबंधित कंत्राटदाराने हे काम आमचे नसून शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने करून घ्यावे सांगितले. शियेतील सात शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने जलवाहिनी (पाईपलाईन ) टाकून घेतलेली आहे. भारतीय किसान संघाचे अध्यक्ष सिद्धार्थ शिंदे यांच्या निदर्शनास ही शेतकऱ्यांनी आणून दिली. त्यानंतर त्यांनी प्राधिकरणचे पंदारकर यांची भेट घेऊन सदर जलवाहिनीच्या कामाविषयी सांगितले. त्यानंतर पंदारकर यांनी सदर काम करून देण्याचे आश्वासनही दिले. पण संबंधित कंत्राटदार जलवाहिन्या पास करून देण्याचा आमचा काही संबंध नाही असे म्हटल्याने शेतकऱ्यांनी शिये येथे महामार्गाचे काम रोखले.

यावेळी सुमारे शंभरहून अधिक शेतकरी उपस्थित होते. यावेळी सिद्धार्थ शिंदे यांनी संबंधित विभागाचा कंत्राटदार रेड्डी व अधिकारी कदम यांना धारेवर धरले. शेतकऱ्यांनी सुद्धा दोघांना जाब विचारला. यावेळी कदम यांनी वरिष्ठांशी फोन करून जलवाहिनीचे काम करून न दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी महामार्ग रोखल्याचे सांगितले. शिंदे व प्राधिकरणचे अधिकारी यांच्यात फोनवर चर्चा झाली. त्यानंतरही शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या जलवाहिनीचे काम आपण रस्त्याच्या खर्चातूनच करून द्यायचे अन्यथा रस्त्याचे काम चालू देणार नाही असा सज्जड इशाराही दिला आहे. जलवाहिनीच्या कामासाठी आपण यापूर्वी जिल्हाधिकारी व प्राधिकऱ्यांच्या अधिकारी यांच्यासोबत बैठक होऊन चर्चा झालेली आहे. त्यामुळे आपणच या खर्चातून या जलवाहीणीचे काम करून द्यावे. अशी ही संबंधित कंत्राटदाराला सांगितले

यावेळी भारतीय किसान संघाचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील, सर्जेराव निरूखे, विलास पाटील, लक्ष्मण पाटील, सरदार पाटील, आनंदा पाटील, प्रकाश तासगावकर ,निवृत्ती राऊत, बाबासो चौगले, महिपती पाटील, बाळासो माने, जयसिंग चौगले,नामदेव शिंदे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news