Pudhari News Exit Poll : निम्म्याहून अधिक महाराष्ट्र महायुतीच्या पाठीशी, NDA ला 27 ते 32 जागा मिळण्याचा ‘पुढारी न्यूज’चा अंदाज

Pudhari News Exit Poll : निम्म्याहून अधिक महाराष्ट्र महायुतीच्या पाठीशी, NDA ला 27 ते 32 जागा मिळण्याचा ‘पुढारी न्यूज’चा अंदाज

पुढारी ऑनलाईन, Pudhari News Exit Poll : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरणार असून, छऊअ अर्थात महायुतीला 32 ते 27 जागा मिळतील, असा अंदाज 'पुढारी न्यूज'च्या महाएक्झिट पोलमधून वर्तविण्यात आला आहे. राज्याच्या सर्व 288 मतदारसंघांत केलेल्या या महाएक्झिट पोलमध्ये खछऊखअ आघाडीला 15 ते 20 जागा; तर इतर पक्षास एक जागा मिळेल, असेही दिसून येत आहे.

महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात झालेल्या राजकीय भूकंपांनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सहानुभूतीच्या लाटेचा फायदा होईल, असे म्हटले जात होते. तथापि, तसे चित्र पाहणीत दिसत नाही. शिवसेनेचे दोन्हीही गट समसमान जागा मिळविताना दिसतात. त्यातही स्ट्राईक रेटच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उजवे ठरताना दिसत आहेत.

15 जागा लढविणार्‍या शिंदेंना आठ ठिकाणी विजय मिळेल; तर 21 जागा लढविणार्‍या उद्धव ठाकरेंनाही आठच जागा मिळतील, असे आकडेवारीवरून दिसते आहे. राष्ट्रवादीचे दोन गट झाल्याने त्यांच्या जागांत गेल्या वेळेपेक्षा एकाने भर पडणार असून, शरद पवार आणि अजित पवार यांचे भवितव्य ठरविणारी बारामतीची जागा अजित पवारांच्या ताब्यात जाईल.

राज्यपातळीवर प्रभावी नेतृत्व नसल्याने भाजपा आणि काँग्रेस अशी थेट लढत असलेल्या किमान 12 ठिकाणी काँग्रेस दुसर्‍या क्रमाकांवर राहील. मात्र गेल्या वेळच्या एका जागेच्या तुलनेत 300 टक्क्यांची वाढ होत काँग्रेसला यंदा चार जागा मिळतील, अशी शक्यता आहे. गेल्या लोकसभेत राज्याचे प्रतिनिधित्व करणारे 21 खासदार आपल्या जागा कायम ठेवतील; तर 14 विद्यमान खासदार पराभूत होतील, असा अंदाज यातून व्यक्त होतो आहे.

संभाव्य विजेत्या विद्यमान खासदारांत भाजपाचे 10, शिवसेनेचे 6, शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 3; तर राष्ट्रवादीच्या
दोन्ही गटांतून प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 10 जागांवरील लढती अत्यंत अटीतटीच्या होणार असून, यात महामुंबई, पश्चिम महाराष्ट्र
व विदर्भातील प्रत्येकी तीन व मराठवाड्यातील एका जागेचा समावेश आहे. या जागांवरील उमेदवारांना मतदारांनी दिलेल्या पसंतीक्रमांत पाच टक्क्यांहून कमी अंतर असल्याने ज्या उमेदवाराची महाएक्झिट पोलच्या आकड्यांत सरशी दिसत आहे, त्यास संभाव्य विजेता म्हणून गृहीत धरले आहे. जसे शिरूरमध्ये आकड्यांनुसार राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे डॉ. अमोल कोल्हे संभाव्य विजेते दिसत असले, तरी त्यांच्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात केवळ दोन टक्क्यांचा फरक आहे. त्यामुळे अशा मतदारसंघांतील अंदाज बदलू शकतात, असे 'पुढारी समूह' प्रांजळपणे नमूद करू इच्छितो. अटीतटीच्या सहा लढतींत भाजपा सर्वाधिक पाच ठिकाणी संभाव्य विजेता होईल, असा अंदाज महाएक्झिट पोलमधून व्यक्त होतो आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news