नागपूर : कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अविकसित ५ गर्भ आढळल्याने खळबळ | पुढारी

नागपूर : कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अविकसित ५ गर्भ आढळल्याने खळबळ

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील लकडगंज परिसरात कचर्‍याच्या ढिगाऱ्यात ५ अविकसित गर्भ आज (बुधवार) सायंकाळी आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील क्वेटा कॉलनीनजीक असलेल्या मोकळ्या मैदानाच्या कडेला ५ नवजात गर्भ फेकले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. टेलिफोन एक्सचेंज ते सुनील हॉटेलकडे जाणाऱ्या मार्गावर उजवीकडे असलेल्या कचरा डंपिंग यार्डमध्ये हे गर्भ फेकून दिले आहेत.

या घटनेमुळे लकडगंज पोलीसही चक्रावून गेले आहेत. या घटनेमुळे राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कथित गर्भपात रॅकेट कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या घटनेने वर्धा जिल्ह्यातील आर्वीच्या हॉस्पिटलमधील भीषण आठवणींना उजाळा दिला आहे. जिथे हॉस्पिटलमध्ये गर्भाची कवटी आणि हाडे पुरलेल्या आढळल्या होत्या.

नागपूर येथील घटनेसंदर्भात पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, काही स्थानिक नागरिकांना हे ५ अविकसित गर्भ दिसले. या नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला अलर्ट केले. त्यानंतर त्वरीत कारवाई करत लकडगंज पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : “स्त्री हे शक्तीचं रूप” – अमृता फडणवीस | Power Women | International Women’s Day 2022

Back to top button