गडचिरोली : आत्मसमर्पित नक्षलवाद्याची आत्महत्या

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : दोन वर्षांपूर्वी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्याने (Naxalites) गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. ८) घडली आहे. नकुल मडावी (वय ३५) असे मृत नक्षलवाद्याचे नाव आहे.
नकुल मडावी व त्याची पत्नी दोघेही नक्षल चळवळीत (Naxalites) कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी दोघांनीही गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यानंतर ते गडचिरोलीनजीकच्या नवेगाव येथे पोलिसांनी आत्मसमर्पित नक्षल्यांसाठी उभारलेल्या नवजीवन वसाहतीत वास्तव्य करीत होते. त्यांना तीन मुले आहेत. मोलमजुरी करुन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. परंतु, मंगळवारी नकुलने वसाहतीमागे असलेल्या जंगलातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. मात्र, मी आत्महत्या करतो, असे तो नेहमी म्हणत असल्याचे त्याच्या पत्नीने सांगितल्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांनी सांगितले.
हेही वाचलंत का ?
- Corbevax : लहान मुलांसाठी ‘कॉर्बेव्हॅक्स’ लस वापरास परवानगी द्या; बायोलॉजिकल-ई कंपनीचा अर्ज
- UP Election Result : योगी की अखिलेश ? दोन शेतकऱ्यांनी १० एकर जमीन लावली पणाला ! पैज जिंकल्यास…
- Sharmaji Namkeen : ऋषी कपूर यांच्या निधनानंतर २ वर्षांनी येणार त्यांचा शेवटचा चित्रपट
पहा व्हिडिओ : “स्त्री हे शक्तीचं रूप” – अमृता फडणवीस | Power Women | International Women’s Day 2022