UP Election : यूपीमध्ये तीन ठिकाणी EVM घोळ; वाराणसीसह ३ केंद्रातील अधिकाऱ्यांवर कारवाई | पुढारी

UP Election : यूपीमध्ये तीन ठिकाणी EVM घोळ; वाराणसीसह ३ केंद्रातील अधिकाऱ्यांवर कारवाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेश निवडणुकीची मतमोजणी होण्यापूर्वीच इलेक्ट्राॅनिक वोटिंग मशीन (EVM) संबंधित तीन प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. वाराणसीमध्ये EVM चोरीच्या आरोपात ADM रॅंकच्या अधिकाऱ्याला पदावरून हटविण्यात आले आहे. त्याचबरोबर बरेली मतमोजणी केंद्रस्थळावर कचऱ्याच्या गाडीत पोस्टर व्हॅलेट मिळल्यामुळे समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला, त्यानंतर जिल्हा प्रशासनाने RO-SDM बहेडी पारूल तरार यांनांही हटविण्यात आले आहे. त्याचबरोबर सोनभद्रमध्ये SDM अधिकाऱ्यालाही हटविण्यात आले आहे. (UP Election)

यासंदर्भात प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे की, EVM च्या नियमांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. सपाच्या कार्यकर्त्यांनी वाराणसी मतमोजणीतील EVM मशीन घेऊन जाताना पकडले होते. वाराणसीच्या आयुक्तांनी त्यांची चूक मान्य केली होती. त्यानंतर निवडणूक आयोग आणि वाराणसी प्रशासनाकडून सांगण्यात आले की, प्रत्यक्ष मतदानात सापडलेल्या EVM मशिन्सचा वापर करण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांना दावा केला आहे की, या EVM मशीन्स ट्रेनिंगसाठी नेण्यात येत होते.

मतमोजणीची सुरूवात होण्यापूर्वीच EVM मशीन्सचा वाद बाहेर आला आहे. अखिलेश यादव यांनी मंगळवारी आरोप केलेला होता की, “मजमोजणीच्या ४८ तास अगोदरच EVM मशीन्सना बेकायदेशीरपणे नेले जात होते. सपाने तसा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यात संबंधित अधिकाऱ्यांनी आपली चूक मान्यदेखील केली होती. (UP Election)

वाराणसीचे आयुक्त दीपक अग्रवाल यांनी मंगळवारी पत्रकारांना माहिती देताना म्हणाले होते की, “EVM संदर्भात प्रशासनाकडून झालेली चूक मान्य आहे. EVM संदर्भात असणाऱ्या प्रोटोकाॅल पाळण्यात आमच्याकडून चूक झाली आहे. पण, ही EVM मशिन्स केवळ ट्रेनिंगच्या उद्देशांसाठी नेण्यात येत होती. पण मी तुम्हाला खात्री देऊ शकतो की, मतदानात वापरण्यात आलेल्या मशिन्स हटविणे अशक्य आहेत. मतमोजणी केंद्राजवळ सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा गार्ड, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी होते.”

पहा व्हिडिओ : आरक्षणाचा पेच | Pudhari Podcast

Back to top button