चंद्रपूर : जमिनीच्या वादातून लहान भावाने मोठ्या अपंग भावाला दगडाने ठेचून मारले | पुढारी

चंद्रपूर : जमिनीच्या वादातून लहान भावाने मोठ्या अपंग भावाला दगडाने ठेचून मारले

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : शेतजमीनीच्या वादातून होत असलेले भांडण टोकाला जाऊन लहान भावाने अपंग असलेल्या थोरल्या भावाची दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथे घडली. राजेश्वर भिवाजी जुमडे असे मृतकाचे नाव आहे. तर बंडू भिवाजी जुमडे असे आरोपी भावाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (Chandrapur)

पोलिसांच्या माहितीनुसार, नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथील मृतक राजेश्वर जुमडे व बंडू भिवाजी जुमडे हे दोन्ही भाऊ भट्टी वार्ड क्रमांक 4 येथील रहिवासी आहेत. आईच्या मृत्यूनंतर दोन्ही भावांमध्ये शेती वादातून वारंवार भांडण होत होते. या कारणामुळे वितुष्ट निर्माण झाले होते. काल दुपारच्या सुमारास झेंडा चौकात लहान भाऊ बंडू जुमडे याने नशेत येऊन अपंग असलेल्या राजेश्वर जुमडे यावेशी शेतजमिनीवरून भांडण करू लागला. (Chandrapur)

दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर थोरला अपंग भाऊ घरी जाण्यासाठी निघाला असता लहान भावाने त्याला लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. थोरला भाऊ अपंग असल्याने त्याने त्याचा प्रतिकार केला नाही. त्यामुळे लाथाबुक्याने मारहाण केल्यांनतर तो बेशुध्द पडला. लहान भाऊ एवढ्यावरच थांबला नाही, त्याने बेशुध्दावस्थेत पडलेल्या राजेश्वरचा दगडाने डोकं ठेचून काढले. त्यामुळे तो जागीच गतप्राण झाला. भर चौकात ही घडल्याने प्रचंड भितीमय वातावरण निर्माण झाले. (Chandrapur)

त्यानंतर तब्ब्ल दोन तास झेंडा चौकात मृतदेह पडून होता. सदर घटना घरच्यांना माहीत झाल्यानंतर मुलाने चौकात येऊन बघितले असता मृतदेह चौकात पडून होता. त्यानंतर लगेच पोलिसांनी माहिती दिली. आरोपी बंडू हा नशापाणी करून असल्याने त्याने हत्येनंतर हैदोस माजविला होता. चौकातील हत्येची माहिती कुणी पोलिसांना दिल्यास त्यांना सोडणार नाही असा दम देऊन चांगलीच दहशत निर्माण केली होती. काही वेळानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतेदह ताब्यात घेतला तर आरोपी बंडू जुमडे याला अटक केली. मृतकाचे प्रश्चात पत्नी 3 मुली, 1 मलगा असा परिवार आहे. शेतीच्या वादातून भावाभावात वितुष्ट निर्माण झाल्याने निरपराध एका अपंग भावाला जिवास मुकावे लागले आहे. परिवार एका कर्त्यापासून पोरका झाला आहे. (Chandrapur)

हेही वाचलत का?

Back to top button