ठाणे : महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
मुरबाड; पुढारी वृत्तसेवा : भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी मिळाली होती. त्यांनी आज (दि.2) शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
सुरेश म्हात्रे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी पवार गट, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, समाजवादी पार्टीसह सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भिवंडी येथील साईबाबा मंदिर येथे दर्शन घेऊन बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत रॅलीद्वारे म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघातुन महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅलीत सहभागी झाले होते.