ठाणे : एसटीला भरधाव डंपरची धडक; एकाचा मृत्‍यू, २० जण जखमी | पुढारी

ठाणे : एसटीला भरधाव डंपरची धडक; एकाचा मृत्‍यू, २० जण जखमी

कल्याण : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सवासाठी कोकणातील आपल्या गावी जाण्यासाठी चाकरमानी कोकणी बांधवांची लगबग सुरू झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक उपनगरातून कोकणी चाकरमानी बांधावांसाठी कोकणात जाण्यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून मोफत एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत. शनिवारी सायंकाळी डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे ग्राउंड मधून हजारो प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या शेकडो एसटी बसेस कोकणाकडे रवाना झाल्या होत्या. यातील एका बसला डंपरची जाेरदार धडक बसली. या भीषण अपघातात एका प्रवाशाचा मृत्‍यू झाला.

डोंबिवलीहून राजापूरला निघालेल्‍या एसटी बस (Mho14- bt 2665) ला प्रवासा दरम्यान माणगाव येथे भरधाव वेगाने समोरून आलेल्या डंपरने जोराची धडक दिली. हा अपघात पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या बसमध्ये एकूण ३८ प्रवाशी होते.समोरून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने दिलेल्या जोरदार धडकेने एसटी मधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, अन्य अठरा ते वीस प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली.

बहुतांशी प्रवाशी डोंबिवली पश्चिमेकडील गरीबाचा वाडा सरोवर नगर व आजू बाजूच्या परिसरातील राहणारे असून, या अपघाताची माहिती कळताच डोंबिवली पश्चिम भागात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : 

Back to top button