Dhangar reservation : धनगर आरक्षणप्रश्नी बैठकीत चर्चेअंती मार्ग निघेल : मंत्री गिरीश महाजन | पुढारी

Dhangar reservation : धनगर आरक्षणप्रश्नी बैठकीत चर्चेअंती मार्ग निघेल : मंत्री गिरीश महाजन

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना धनगर समाज आरक्षणाचा अभ्यास झालेला आहे. लवकरच मंत्री मंडळात बैठक लावून त्यावर चर्चेअंती मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.  चौंडी (ता. जामखेड) येथे धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश दोन तरुणांनी उपोषण सुरू केले आहे. त्यातील एकाची प्रकृती खालावल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्या उपोषणकर्त्याची आज मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली.

यावेळी आमदार राम शिंदे, अ‍ॅड. अभय आगरकर उपस्थित होते. मंत्री महाजन म्हणाले, मंत्री मंडळाची बैठक होती. त्यातही हा विषय मी घेतला आहे. गेल्या अकरा दिवसांपासून उपोषण सुरू आहे. त्यात उपोषणकर्त्यांचे 11 किलो वजन कमी झाले आहे. त्याच्या तब्यतेची काळजी शासनाला असून, त्यामुळे त्यांनी उपोषण सोडावे यासाठी मी आलो होतो. आरक्षणावर सोमवारी बैठक होईल. त्यात चर्चा करून का मार्ग काढता येईल. मुख्यमंत्री व अधिकारी यांच्या चर्चेतूनच हा मार्ग निघेल. आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यास उशिर झाला. आज बैठक संपल्यानंतर लगेच संभाजीनगर वरून नगरला आलो. पालकमंत्र्यांनी उपोषणकर्त्याची भेट घेतली नाही, असे पत्रकारांनी विचारले असता त्यांनी अधिकचे बोलणे टाळले.

उपोषणकर्ते आण्णासाहेब रुपनवर म्हणाले, साहेब धनगर ही माणसे नाहीत का किती अन्याय करणार आहात. 70 वर्षांपासून आमच्यावर प्रचंड अन्याय सुरू आहे. घटनेत असताना तुम्ही देत नाहीत. 2014 मध्ये फडणवीस साहेब म्हणाले होते, पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊन टाकू. एकीकडे एक न्याय आणि आम्हाला एक न्याय मिळतो. त्यामुळे प्रचंड वेदना होत आहेत.

धनगर समाजाचा या सरकारला इतका राग का आहे हेच समजत नाही. प्रचंड ताकदीने आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहिले. गेल्या अकरा दिवसांपासून उपोषणाला बसलो पण एकाही मंत्र्याला वाटले नाही की उपोषणकर्त्याची भेट घ्यावी. पालकमंत्र्यांनीही भेट घेतली नाही. दोन दिवसांत निर्णय नाही लागला तर मी वैद्यकीय सुविधा नाकारणार आहे.

हेही वाचा

अहमदनगर : महिलेवर पेट्रोल ओतून ठार मारले; दोघांना जन्पठेपेची शिक्षा

Ganeshotsav 2023 : पेणमधून ३ लाख गणेशमूर्ती विदेशात रवाना

ओबीसी आरक्षणात नवा वाटेकरी नसेल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Back to top button