डोंबिवलीत छेडले एकाने भोसकले भलत्यालाच | पुढारी

डोंबिवलीत छेडले एकाने भोसकले भलत्यालाच

डोंबिवली; प्रतिनिधी :  रस्त्याने जाणाऱ्या बहिणीला कुणीतरी सडकसख्याहाऱ्याने छेडल्याने संतापलेल्या तिच्या भावाने भलत्याच तरुणाला पकडून त्याला बेदम मारहाण तर केलीच, शिवाय चाकूच्या साह्याने सपासप वार करून या तरुणाला जायबंदीही केले. हा रक्तरंजित थरार गुरूवारी रात्रीच्या सुमारास घडल्याने सांगर्ली परिसरात खळबळ माजली.

विठ्ठल भालेकर (३२, रा. गणेश अपार्टमेंट, जिमखाना रोड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर पवन पाटील (२०) असे फरार हल्लेखोराचे नाव आहे. मात्र विठ्ठल हा आपल्या बहिणीला छेडणारा नसल्याचे कळताच पश्चाताप झालेल्या हल्लेखोर पवन याने तेथून पळ काढला.
डोंबिवली पूर्वेकडील जिमखाना रोडला असलेल्या सांगली गावात गुरुवारी रात्रीच्या सुमारास एका तरुणीची अज्ञाताने छेड काढली. हा प्रकार या तरुणीने घरी जाऊन आपल्या कुटुंबाला सांगितला. बहिणीची छेड काढल्यामुळे भाऊ पवन पाटील संतापला. त्याने सांगली परिसरात छेड काढणाऱ्या तरुणाचा शोध सुरू केला.

रात्री साडेदहाच्या सुमारास सुमारास विठ्ठल भालेकर हा रस्त्याने जात होता. पवन पाटील याने त्याला गाठले. बहिणीने सांगितलेल्या वर्णनावरून पवनला संशय आला. कोणतीही विचारपूस न करता त्या विठ्ठल याला बेदम मारहाण सुरू केली. मारहाण का करतोस विचारले तर मात्र पवन याने काही न ऐकता विठ्ठलला मारहाण सुरूच ठेवली.

Back to top button