कल्याण : आंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर महिलेची प्रसुती; दिला गोंडस मुलीला जन्म | पुढारी

कल्याण : आंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर महिलेची प्रसुती; दिला गोंडस मुलीला जन्म

कल्याण; पुढारी वृत्तसेवा : आंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटावर भरदुपारच्या सुमारास एका महिलेने गोंडस मुलीला जन्म दिल्याची घटना मंगळवारी (दि, १३) दुपारी घडली. रेल्वे पोलिसांनी महिलेच्या मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ वर आसनगाव लोकलने शहापूर येथे आपल्या नातेवाईकांसोबत  प्रवास करत होत्या. दुपारी १ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्या. जी आर् पी स्टाफच्या महिला काँन्स्टेबल रितु कुमारी आणि ए. एस्. आय्. प्रकाश बागुल यांनी घटनास्थळी धाव घेत या महिलेचे सुखरूप बाळतंपण केले. या घटनेत प्रमिला गणेश मुकणे (वय २३) वर्षे यांनी गोंडस मुलीला जन्म दिला. महिलेची प्रसुती सुखरूप झाल्याने उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.

हेही वाचा;

Back to top button