शाखा ताब्यात घेतल्यानंतर ठाण्याचे माजी महापौर बऱ्याच वर्षांनी डोंबिवलीत | पुढारी

शाखा ताब्यात घेतल्यानंतर ठाण्याचे माजी महापौर बऱ्याच वर्षांनी डोंबिवलीत

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली येथील मध्यवर्ती शाखा ताब्यात घेतल्यांनातर बाळासाहेबांच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातवरण पहायला मिळाले. यावेळी दिवसभर शाखेत कार्यकर्त्यांची गर्दी होती. दुपारी माजी महापौर नरेश म्हस्के यांनी शाखेत हजेरी लावली. यावेळी उद्धव ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर टीकेची झोड उठवत शेतकऱ्यांना मागील सरकारने फसवल्याचा आरोप त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला. तर, राज ठाकरे यांची भेट अविस्मरणीय ठरल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शाखा आमचीच होती या शाखेसाठी आम्ही अनेक गोष्टी केल्याचे त्यांनी सांगितले.

शाखा आमचीच होती केवळ कायदेशीर बाबी पूर्ण केल्या…

यावेळी त्यांनी ९९ टक्के शिवसैनिक हे शिंदे साहेबांसोबत आहेत. त्यामुळे हक्क सांगायचा विषय येत नाही. हक्क आणि कर्तव्य हे एक नाण्याच्या दोन बाजू आहेत. जे लोक हक्क सांगत आहेत त्या लोकांनी या शाखेसाठी काय केले ? शाखेत काय कमी आहे ते पाहून ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न कधी केला का ? असा प्रश्न उपस्थित केला. या शाखेसाठी खर्च केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मग बाकी लोकांचा काय संबंध. शिवसेना शाखा ताब्यात घेण्याचा आता काही विषयच येत नाही. धर्मवीर आनंद दिघेंनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली या शाखांमध्ये काम सुरू होते.

त्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे असतील, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे असतील, शहर प्रमुख राजेश मोरे या मंडळींनी या शाखेत बसूनच काम केले. जी आमची गोष्ट आहे ती ताब्यात घ्यायची. डोंबिवली मध्ये शहर प्रमुख राजेश मोरे होते ते शिंदे गटामध्ये आलेले आहेत. त्याचबरोबर जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे देखील शिंदे गटाबरोबरच आहेत असे असताना ही शाखा कोणाची आहे हे आपण देखील समजू शकता या ठिकाणचे टॅक्स लाईट बिल देखील आमच्याच नावावर आहेत. रीतसर गोष्टी करण आवश्यक आहे त्या देखील आम्ही केल्या असे नमूद केले.

बऱ्याच वर्षांनी म्हस्के डोंबिवलीत…

बऱ्याच वर्षांनी शाखेत आला आहात असे विचारले असता मी नेहमीच कल्याण डोंबिवलीकरांच्या संपर्कात असतो. निवडणुकीला तर असतोच. मात्र आज अनेक दिवसांनी या शाखेत आल्याने बरे वाटले. कल्याण डोंबिवली हा ठाणे जिल्ह्याचा एक भाग आहे आणि अम्हीनयेथें सुरुवातीपासून काम केल्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. मी नेहमीच कल्याण डोंबिवलीकरांच्या संपर्कात असतो. निवडणुकीला तर असतोच . मात्र आज अनेक दिवसांनी या शाखेत आल्याने बरे वाटले. कल्याण डोंबिवली हा ठाणे जिल्ह्याचा एक भाग आहे .

राज ठाकरे यांची भेट म्हणजे आठवणींना उजाळा

राज ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात बोलताना त्यांनी संगितले की, राज ठाकरे यांना भेटण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर गेलो होतो. त्यांना दिवाळीची सदिच्छा भेट दिली. सोळा सतरा वर्षानंतर त्यांची भेट झाली एकेकाळी मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. त्यांच्यामुळे मी घडलो होतो. राज ठाकरे यांच्या बद्दल सगळ्यांच्या मनात एक वेगळी प्रतिमा आहे.त्यांना भेटून छान वाटले . सगळ्याच गोष्टींमध्ये राजकारण नसत .राजकारणा पलिकडे एक वेगळे नाते असते.

नोटांच्या पोलिसीवर वाद नको

नोटांची पॉलिसी ही आपण ठरवू शकत नाही. यासाठी पंतप्रधान, अधिकारी, लोकशाही या सगळ्यांचा विचार केला जाईल यावर आपण चर्चा करून वाद घालण्यात काही अर्थ नाही असे त्यांनी सांगितले.

ठाकरे सरकारवर केली टीका

अर्ध्या तासात शेतकऱ्यांची दैना पाहून झाली , नाईट लाईफसाठी स्वारी सातच्या आत परतली अशी काव्यपंक्ती त्यांनी तयार केली. त्याचबरोबर उद्धव ठाकरे लक्झरीअस दौरे करत बसले. कधीही घराबाहेर पडले नाहीत. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असे जाहीर केले मात्र ते पैसे देखील जमा झाले नाहीत असे सांगत नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली . त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सातबारा देखील कोरा करण्याचे सांगितले ते देखील शिंदे – फडणवीस यांच्या सरकारने केले. शेतकऱ्यांचे अश्रू पूसण्याचं त्यांच्याकडून केवळ नाटकच करण्यात आले. शिंदे फडणवीस सरकारवर टीका करण्यासाठी ही नाटक केली जात असल्याचे शेतकऱ्यांना देखील कळत आहे असे म्हस्के यांनी नमूद केले.

हेही वाचा;

Back to top button