नाशिक : बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ | पुढारी

नाशिक : बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

देवळा, पुढारी वृत्तसेवा : गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह आज (दि. २७) दुपारी देवळा येथील कोलथी नदीजवळ आढळून आला. देवळा येथील सलून व्यावसायिक तुषार काशिनाथ हिरे (वय ३९ ) हा तरुण सोमवारी (दि २४) पहाटेपासून बेपत्ता होता. दरम्यान, तुषारचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, येवळा येथील सलून व्यावसायिक तुषार हिरे सोमवारी (दि २४) पहाटे साडेपाच वाजेपासून बेपत्ता होता. याबाबतची तक्रार हिरे यांच्या नातेवाईकांनी देवळा पोलिसांत दिली होती. सर्व ठिकाणी संपर्क करून देखील त्याचा शोध लागत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती.

अखेर तुषार हिरे याचा मृतदेह गुरुवारी ( २७) रोजी दुपारी कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नकाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. हिरे यांच्यावर देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button