तब्बल दोन वर्षांनी सांस्कृतिक नगरीत रंगणार रासगरबा | पुढारी

तब्बल दोन वर्षांनी सांस्कृतिक नगरीत रंगणार रासगरबा

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : तब्बल दोन वर्षांनी सांस्कृतिक नगरीत रास गरबा रंगणार असून त्यासाठी डोंबिवली येथील डीएनसी शाळेच्या मैदानात जय्यत तयारी सुरू झाली आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन तर्फे रासरंग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री खास उपस्थिती लावणार आहेत. दरम्यान, दिव्यांग मुलांसाठी खास रास गरब्याचे आयोजन केले आहे.

नवरात्र उत्सवाची सुरूवात सोमवार पासून होणार आहे. कोरोना नंतर तब्बल दोन वर्षांनी साजरा होणारा उत्सव मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी डीएनसी शाळेच्या मैदानात जय्यत तयारी सुरू झाली आहे. या उत्सवात मुख्यमंत्र्यांसह विविध नेते उपस्थित राहणार असून कलाकारांनाही निमंत्रण देण्यात आल्याचे माहिती शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली. या कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांनाही रास गरबा खेळण्यासाठी विशेष आमंत्रण देण्यात आले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button