२२ वर्षानंतर औरंगाबादला मिळाला स्थानिक पालकमंत्री; संदीपान भुमरेंकडे सोपवली जबाबदारी | पुढारी

२२ वर्षानंतर औरंगाबादला मिळाला स्थानिक पालकमंत्री; संदीपान भुमरेंकडे सोपवली जबाबदारी

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या रुपाने औरंगाबाद जिल्ह्याला गेल्या २२ वर्षात पहिल्यांदाच स्थानिक पालकमंत्री लाभले आहेत. याआधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या, नंतर भाजप-शिवसेना युती सरकारच्या आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातही जिल्ह्याला जिल्ह्याबाहेरचे पालकमंत्री देण्यात आले होते.

राज्यात १९९५ ते १९९९ या काळात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. त्यावेळी औरंगाबादच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी औरंगाबादचे स्थानिक आमदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे सोपविण्यात आलेली होती. १९९९ साली राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आले. तेव्हापासून आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सतत जिल्ह्याबाहेरच्याच व्यक्तीकडे राहिले. मागील २२ वर्षात पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, रामदास कदम, डॉ. दीपक सावंत, सुभाष देसाई तसेच काही काळासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे पालकमंत्रीपदाची धुरा राहिलेली आहे.

  • राधाकृष्ण विखे पाटील : अहमदनगर
  • सुधीर मुनगंटीवार : सोलापूर, चंद्रपूर व गोंदिया
  • चंद्रकांत पाटील : पुणे
  • विजयकुमार गावित : नंदुरबार
  • गिरीश महाजन : धुळे, लातूर व नांदेड
  • गुलाबराव पाटील : बुलढाणा
  • दादा भुसे : नाशिक
  • संजय राठोड : यवतमाळ व वाशिम
  • सुरेश खाडे : सांगली
  • संदिपान भुमरे : औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर),
  • उदय सामंत : रत्नागिरी व रायगड
  • तानाजी सावंत : परभणी व उस्मानाबाद (धाराशिव)
  • रवींद्र चव्हाण : पालघर व सिंधुदुर्ग
  • अब्दुल सत्तार : हिंगोली
  • दीपक केसरकर : मुंबई शहर व कोल्हापूर
  • अतुल सावे : जालना व बीड
  • शंभूराज देसाई : सातारा व ठाणे
  • मंगलप्रभात लोढा : मुंबई उपनगर

हेही वाचलंत का?

Back to top button