ठाण्यात दहीहंडी थरांवरून कोसळून ५ गोविंदा जखमी | पुढारी

ठाण्यात दहीहंडी थरांवरून कोसळून ५ गोविंदा जखमी

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उत्सवांवर लादण्यात आलेले निर्बंधात शिथिलता आली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी दहीहंडी उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या हंड्यातील लोणी लुटण्यासाठी लावण्यात येणार्‍या थरावरून पडून ५ गोविंदा कीरकोळ जखमी झाल्याची नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयासह छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात करण्यात आली. यामध्ये १५ आणि १६ वर्षीय बालकांचा समावेश असून त्यांच्या हाताला दुखापत झाली असल्याची रुग्णालय प्रशासनाने दिली.

कोरोना निर्बंधातून शिथिलता मिळताच, गोविंदाची पांढरी असलेले ठाणे शहर पुन्हा ढाकमाकूच्या संगीताने गजबजून गेला होता. यावेळी शहरातील घोडबंदर रोड, वर्तकनगर, टेंभीनाका, जांभळीनाका, भगवती मैदान आणि रहेजा गार्डन या ठिकाणी लोकप्रतिनिधींकडून मोठ्या थरथराटात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत असतो. त्यात शहरातील ठिकठिकाणी राहिवाशांकडून आपल्या परिसारात देखिल उत्सहात साजरा करण्यात येत असतो.

यावेळी या दहिहंड्यातील दही लुटण्यासाठी गोविंदा रे, गोपाळा च्या जय घोषात ठाणे-मुंबई शहरातून गोविंदा पथक येत असतात. त्यात हंड्या फोडतांना रचण्यात येणार्‍या थरातून कोसळून गोविंदा जखमी होण्याच्या घटना देखिल घडत असतात. यंदाच्यावर्षी आतापर्यंत ५ गोविंदा जखमी झाली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये एक ३८ वर्षीय सूरज पारकर यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यावर उपचार करून सोडण्यात आले. तर, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कळवा येथील वाघोबा नगर येथे राहणारा नितीन चव्हाण (१६), कोपरितील गांधीनगर येथील शैलेश पाठक (३२) यांच्या तर, शितलू तिवारी (२५) या दोघांच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. तसेच साहिल जोगळे (१५) डाव्या हाताला दुखापत झाली होती. या सर्वांवर उपचार करून घरी सोडण्यात आले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

Back to top button