कल्याण : पालिकेचे सार्वजनिक शौचालय कोसळून गर्भवती महिला जखमी | पुढारी

कल्याण : पालिकेचे सार्वजनिक शौचालय कोसळून गर्भवती महिला जखमी

कल्याण; पुढारी वृत्तसेवा : मोहने येथील लहुजी नगर या दलित बहुल वसाहतीमधील सार्वजनिक शौचालय कोसळून एक गर्भवती महिला जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि. ३) घडली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून लहुजी नगर वसाहतीतील या शौचालायाच्या डागडुजीकडे सततचे दुर्लक्ष केले जात होते. अखेर ते शौचालय बुधवारी कोसळले. यामध्ये जखमी असलेल्या गर्भवती महिलेची प्रकृती सध्या स्थीर आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून लहुजी नगर वसाहतीतील या शौचालायाच्या डागडुजीकडे सततचे दुर्लक्ष केले जात होते. अखेर ते शौचालय बुधवारी कोसळले. यामध्ये जखमी असलेल्या गर्भवती महिलेची प्रकृती सध्या स्थीर आहे. बुधवारी लहुजी नगर या दलित बहुल वसाहतीत सार्वजनिक शौचालय शौचालयाच्या भांड्यासह कमकुवत भाग सेफ्टी टँकमध्ये कोसळले. दरम्यान या दुर्घटनेत एक गभर्वती महिला जखमी झाली होती. या घटनेनंतर पालिका अधिकाऱ्यांनी फक्त पाहणी केली. यानंतर अखेर बुधवारी रात्री पूर्ण शौचालय कोसळल्याने आजूबाजूच्या घराचे देखील मोठया प्रमाणात नुकसान झाले.

मोहने येथील लहुजी नगर येथे सुमारे २७ वर्षांपूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने चार पुरुषांकरिता तर चार महिलांकरिता सार्वजनिक शौचालय बांधले होते. मात्र या शौचालयांच्या देखभाल दुरुस्ती करता वारंवार निधी उपलब्ध करूनही ठेकेदार वरच्यावर मलमपट्टी करून पालिकेकडून दुरुस्तीचे बिल उकळण्यात धन्यता मानत होते. या शौचालयांची अवस्था अत्यंत वाईट झाली होती व याचे कडी कोयंडे ते दरवाजे नसल्याचे दिसून येत होते.

बुधवारी सकाळी उमा रिठे (वय २२) ही गर्भवती महिला साडेसहाच्या सुमारास प्रांत विधीसाठी गेले असता अत्यंत कमकुवत झालेले शौचालयाच्या भांड्यासह भाग कोसळून सदरहू महिला सेफ्टी टँक मध्ये पडली. गर्भवती असलेल्या महिलेने कसेबसे स्वतःला सावरत सेफ्टी टँक मधून बाहेर पडण्याचा आटोक्यात प्रयत्न करू लागली होती. मात्र ती गाळात रुतल्याने तिला बाहेर पडणे मुश्किल होऊन बसले याच दरम्यान तिने आपला जीव वाचवण्या करिता मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरु करू केला. तेव्हा शौचालयाच्या नजीक राहत असणाऱ्या एका नागरिकाने तिचा आवाज ऐकल्याने घटनास्थळी जात सेफ्टी टँक मध्ये अडकलेल्या गर्भवती महिलेला मोठ्या शिताफीने बाहेर काढले.

या दुर्घटनेत गर्भवती महिलेस इजा झाली असून तिला एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या संदर्भात कल्याण डोंबिवली मनपाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांना संपर्क साधला असता आपण कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवत असल्याचे यावेळी सांगितले. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी केवळ पाहणी करून निघून गेले आणि बुधवारी रात्री हे शौचालय कोसळले. शौचालय कोसळल्याने आजूबाजूच्या घराचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर येथील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्र घतला असून देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष लोटली तरी मूलभूत सोयीसाठी येथील नागरिकांना झगडावे लागत असल्याने आक्रोश व्यक्त केला जात आहे.

Back to top button