ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर झाड कोसळले | पुढारी

ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर झाड कोसळले

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडी या निवास्थाबाहेर सर्व्हिस रोडजवळ वृक्ष पडल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा देण्यासाठी महापालिकेचे जवळ जवळ सर्वच अधिकारी बंगल्यावर गेले असतांना घटनेची माहिती मिळताच येथील वृक्ष हटविण्यात येऊन वाहतुक सुरळीत करण्यात आली. यात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या गाडीवर हे झाड पडले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

मंगळवारी दुपारी 12.50 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या ठिकाणी सर्व्हिस रोडच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे येथे खोदकामही करण्यात आलेले आहे. त्यामुळे येथील वृक्षाची मुळे देखील बाहेर आली होती. त्यात सोमवारपासून सुरु असलेल्या पावसामुळे वृक्षाच्या आजूबाजूची जमीन देखील भुसभुशीत झाली होती. त्यामुळेच हे वृक्ष पडले असावे असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक आणि अग्निशमन विभागाच्या पथकाने हे वृक्ष बाजूला काढले आहे. वृक्ष हटविण्यासाठी सुमारे पाऊण तासाचा कालावधी गेल्याचे सांगण्यात आले.

Back to top button