कुंडलिका नदीत ठाण्यातील तरुणाचा बुडून मृत्यू | पुढारी

कुंडलिका नदीत ठाण्यातील तरुणाचा बुडून मृत्यू

माणगाव : पुढारी वृत्तसेवा :  मुंबई येथून 3 जुलै रविवारी सकाळी 17 तरुण पर्यटक माणगाव तालुक्यात आले होते. भिरा येथील देवकुंड पाहून झाल्यानंतर परत माघारी फिरल्यानंतर रस्त्यात असणार्‍या माणगाव तालुक्यातील म्हसेवाडी गावचे हद्दीतील कुंडलिका नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यापैकी तिघे पाण्यात उतरले. त्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील एका तरुणाचा पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाला. तर उर्वरित दोघांना बुडत असताना त्यांना उर्वरित साथीदार मित्रांना बाहेर काढण्यात यश आले. मृत तरुणाचे नाव दिनेश तुकाराम शिंदे (वय 24, रा.पिंपरीगाव, दहिसर मोरी, ठाणे) असे आहे.

या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. देवकुंड पाहिल्यानंतर ते सर्वजण परत फिरले. त्यानंतर ते म्हसेवाडी गावचे हद्दीतील कुंडलिका नदीपात्रात पोहोण्यासाठी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास गेले. त्यात दिनेश शिंदे याचा पाण्याचा प्रवाहात बुडून मृत्यू झाला. तर त्याचे साथीदार संदीप ताबेकर व हर्षद मेंदे या दोघांना पाण्यात बुडताना वाचविण्यात यश आले.

दरम्यान बुडताना बचवण्यात आलेल्या संदीप ताबेकर व हर्षद मेंद या दोघांना प्राथमिक उपचाराकरिता माणगांव उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृत दिनेश तुकाराम शिंदे याचे शव उत्तरिय तपासणी करीता उप जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम माणगाव पोलीस ठाण्यात सुरू होते.

Back to top button