ठाणे: दत्ता भरणे यांना प्रशांत जाधव यांचा इशारा | पुढारी

ठाणे: दत्ता भरणे यांना प्रशांत जाधव यांचा इशारा

पुढारी  ऑनलाईन, ठाणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे वादात सापडले आहेत. दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दत्तामामा यांनी सोलापुरातील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना ओघाने “मुख्यमंत्र्यांचं जाऊ दा, मरु द्या” असं वक्तव्य केलं होतं.

त्यावरुन नवीन पनवेल शिवसेना उपविभाग प्रमुख प्रशांत जाधव यांनी सोलापूरचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

“कोण हे दत्तात्रय भरणे, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? नसेल तर शिवसैनिक ठिकाणावर आणतील यापुढे अशी बेताल वक्तव्य खपून घेतली जाणार नाही.

तोंडावरती स्वतःच्या आवर घाला, अन्यथा शिवसेना स्टाईलने आम्ही उत्तर देऊ.

असा सज्जड इशारा प्रशांत जाधव यांनी दिला आहे.

हेही वाचा:

Back to top button