सोलापूर महापालिकेच्या ११५७ कोटींच्या अंदाज पत्रकास मान्यता | पुढारी

सोलापूर महापालिकेच्या ११५७ कोटींच्या अंदाज पत्रकास मान्यता

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर महापालिकेच्या सन २०२४ – २५ च्या अंदाजपत्रक स्थायी समितीने लेखाशिर्षांतर्गत काही किरकोळ फेर बदलासह आयुक्त तथा प्रशासकांना सादर केला. एकूण रक्कमेमध्ये कोणतेही बदल न करता ११५७.२२ कोटींच्या अंदाजपत्रकास प्रशासकांनी अंतिम मान्यता दिली.

आयुक्त शितल तेली उगले यांनी सन २०२४ – २५ च्या १ हजार १५७ कोटी २२ लाख रुपयांचे अंदाजपत्रक शुक्रवारी (दि. १६) सादर केले होते. स्थायी समितीने लेखाशिर्षांतर्गत काही किरकोळ फेर बदलासह आयुक्त यांनी सादर केलेल्या एकूण रक्कमेमध्ये कोणतेही बदल न करता ११५७.२२ कोटीच्या अंदाजपत्रकास मान्यता देवून मनपा सभेच्या मंजुरीसाठी शिफारस केली. त्यास मनपा सभेने अंतिम मान्यता दिली.

सन २०२४ – २५ च्या अंदाजपत्रकात मनपा उत्पन्न व खर्च ७१०.७२ कोटी रूपये, शासन अनुदान ३६९.७१ कोटी रूपये, कर्ज ७६.८० कोटी प्रमाणे सादर करण्यात आले होते. आयुक्त यांनी एकूण ११५७.२२ कोटीच्या सन २०२४ – २५ च्या अंदाजपत्रकास दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी स्थायी समितीने लेखाशिर्षांतर्गत काही किरकोळ फेर बदल केले. एकूण रक्कमेमध्ये कोणतेही बदल न करता ११५७.२२ कोटीच्या अंदाजपत्रकास मान्यता देवून मनपा सभेच्या मंजुरीसाठी शिफारस केली व त्यास मनपा सभेने अंतिम मान्यता दिली.

हेही वाचा 

Back to top button