परभणीचे डॉ. सदानंद भिसे यांची सोलापूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी निवड | पुढारी

परभणीचे डॉ. सदानंद भिसे यांची सोलापूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी निवड

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा:  डॉ. सदानंद भिसे यांची नुकतीच सोलापूर वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता पदी निवड झाली आहे.गंगाखेडचे सुपुत्र तथा परभणी येथील वृंदावन कॉलनीत स्थायिक झालेले भिसे यांची डॉ. वेशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे अधिष्ठातापदी निवड करण्यात आली आहे. त्यांनी अधिष्ठातापदाचा पदभारही स्वीकारला.

डॉ.सदानंद भिसे यांनी यापूर्वी परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे न्याय वैधकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख तसेच अधिष्ठाता म्हणून कार्यभार सांभाळला आहे. डॉ.भिसे यांनी यापूर्वी जे.जे. हॉस्पिटल मुंबई येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच राज्य अवयव प्रत्यारोपण समिती प्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. गंगाखेड शहराच्या भूमिपुत्राला वैद्यकीय क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध झाल्यामुळे डॉ.सदानंद भिसे यांचे गंगाखेड शहर, तालुका व जिल्हाभरातून स्वागत होत आहे.

हेही वाचा 

Back to top button