सोलापूर : मराठा आरक्षणाला सामाजिक न्याय आंदोलन संघटनेचा पाठिंबा

सोलापूर : मराठा आरक्षणाला सामाजिक न्याय आंदोलन संघटनेचा पाठिंबा

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण देण्याची नितांत गरज आहे, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने तात्काळ मराठा आरक्षण लागू करावे, अशी मागणी सामाजिक न्याय आंदोलन संघटनेचे प्रमुख प्रा. विजय क्षीरसागर यांनी तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनामध्ये केली.

नळदुर्ग तुळजापूर महामार्गावर सुमारे दोन अडीच तास जोरदार रस्ता रोको करण्यात आला. वाहनांची मोठी गर्दी रस्त्याच्या दुतर्फा झाली होती. तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे तीर्थ बुद्रुक तीर्थ खुर्द बारूळ आणि बिजनवाडी येथील नागरिकांनी आंदोलन केले.

या आंदोलनाचे नेतृत्व बब्रुवान माडजे, भैरवनाथ माडजे, बिरू सोनटक्के, समाधान मोरे, अनंत मोरे, राकेश गायकवाड, विश्वंभर पठाडे, संतोष जाधव, सतीश नावडे, भास्कर सगट, बाबासाहेब जाधव, दिनकर पवार यांनी केले. सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करून मराठा समाजाला आरक्षणाची संधी दिलीच पाहिजे, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news