पंढरपूर : विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी माजी सभापतीसह 5 जणांना न्यायालयीन कोठडी | पुढारी

पंढरपूर : विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी माजी सभापतीसह 5 जणांना न्यायालयीन कोठडी

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : एका विवाहितेवर अत्याचार करून व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी माजी सभापती दिलीप घाडगे याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पाच जणांना आज (दि.५) न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दिलीप घाडगे, सुबोध वाघमारे, सोहम लोखंडे, लखन वाघमारे व हुसेन मुलाणी अशी या ५ जणांची नावे आहेत.

तालुका पोलीस ठाण्यात सुमारे अडीच महिन्यापूर्वी एका पिडीत विवाहितेने फिर्याद दाखल केली होती. ती अंघोळ करीत असताना दत्तात्रय रेवणसिद्ध रणदिवे याने मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रीत केला. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार करताना त्याने पुन्हा व्हिडीओ चित्रित करून व्हिडीओ व्हायरल केला. दिलीप घाडगे यानेही हा व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप पिडीत महिलेने फिर्यादीत केला आहे. त्यानुसार विनयभंग, अत्याचार, माहिती तंत्रज्ञान व इतर कलमान्वये गुन्हा नोंद झाला होता. यातील मुख्य संशयित दत्तात्रय रणदिवे याला पोलिसांनी तात्काळ अटक केली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, व्हिडीओ व्हायरल प्रकरणी दिलीप घाडगे व इतर पाच जणांची नावे समोर आल्याने तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांना अटक न करता कायदेशीर तरतुदींनुसार नोटीस देऊन सोडण्यात आले.

त्यानुसार शुक्रवारी (दि.५) या पाच जणांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.पी. बागुल यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला. मात्र, त्यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे या चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. शनिवारी (दि.६) यावर सुनावणी होणार आहे. आरोपींच्या वतीने ॲड.एम. बी. शिंदे, तर सरकार तर्फे ॲड. पठाण यांनी काम पाहिले.

हेही वाचा :

Back to top button