Lok Sabha Election: विजेच्या धक्क्याने दोन्ही हात गमावले, डाव्या पायाच्या अंगठ्याने बजावला मतदानाचा हक्क, पाहा व्हिडिओ | पुढारी

Lok Sabha Election: विजेच्या धक्क्याने दोन्ही हात गमावले, डाव्या पायाच्या अंगठ्याने बजावला मतदानाचा हक्क, पाहा व्हिडिओ

पुढारी ऑनलाईन डेस्क: देशात (Lok Sabha Election) लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज (दि.७ मे) पार पडत आहे. १२ राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशात सकाळी ७ वाजतापासून मतदानाला उत्साहात सुरूवात झाली आहे. दरम्यान गुजरातमधील नडियात मतदारसंघात दोन्ही हात नसलेल्या मतदाराने डाव्या पायांच्या एका अंगठ्याने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या संदर्भातील व्हिडिओ एएनआयने शेअर केला आहे.

अंकित सोनी या मतदाराने नडियादमधील मतदान केंद्रावर पायाच्या मदतीने मतदान केले आहे. यावेळी त्यांनी २० वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने माझे दोन्ही हात गमवल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. पुढे ते म्हणाले, माझ्या शिक्षक आणि गुरूंच्या आशीर्वादाने मी माझे कम्प्युटर सायन्स या विषयात ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. त्यामुळे मी लोकांना घराबाहेर पडून मतदान (Lok Sabha Election) करण्याचे आवाहन करतो, असेही अंकित सोनी यांनी म्हटले आहे.

Lok Sabha Election: १२ राज्यासह एका केद्रशासित प्रदेशात आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान

लोकसभा निवडणुकीच्य तिसऱ्या टप्प्यात आसाम, बिहार, छत्तीसगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यात आज मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात सकाळी ९ पर्यंत १०.५७ टक्के मतदान झाले होते, तर त्यानंतरच्या टप्प्यात ११ वाजेपर्यंत २५. ४१ टक्के मतदान झाले.

हेही वाचा:

 

Back to top button