सोलापूर: अक्कलकोट येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचा निषेध | पुढारी

सोलापूर: अक्कलकोट येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचा निषेध

अक्कलकोट: पुढारी वृत्तसेवा : महात्मा बसवेश्वर महाराज यांच्याविषयी अवमानकारक विधान केल्याप्रकरणी वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने आज (दि.१८) राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला. अक्कलकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आव्हाड यांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पोस्टर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी राहुल वाडे, सौरभ हळके, रुद्रय्या स्वामी, धनराज पाटील, शिवशंकर स्वामी, आकाश अळ्ळोळी, दिनेश कळीमठ, प्रथमेश पवार, सिद्धू गुब्याड, वैभव मोरे, विशाल कलबुर्गी, पवन चव्हाण, समर्थ अडवितोटे, आकाश बहिरगोंडे, रोहित देशमुख, प्रसन्न गवंडी, अभि बकरे, यश कडगंची, विश्वनाथ सोलंकर, योगी चांदोडे, प्रशांत पाटील, निखिल झगे, समर्थ गोरे आदी युवक उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button