सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक असलेले धनगर समाजाचे कार्यकर्ते शेखर बंगाळे यांना पोलिसांनी रविवारी (दि.१५) रात्री शासकीय विश्रामगृह येथून ताब्यात घेतले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यासाठी बंगाळे आला होता. परंतु, पालकमंत्री येण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.
धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे, यासाठी शेखर बंगाळे याने यापूर्वी राज्याचे महसूल मंत्री तथा तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर शासकीय विश्रामगृहातच भंडारा उधळला होता. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा भाग म्हणून बंगाळेला रविवार रात्री शासकीय विश्रामगृह येथे विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आले असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा