नवी दिल्ली : कोणत्याही गोष्टीबाबत 'अति सर्वत्र वर्जयेत' हे लक्षात ठेवणे गरजेचे असते. 'अति तिथे माती' हे अक्षरशः सत्य आहे. पाणी भरपूर प्यावे हे खरे असले तरी पाण्याचाही अतिरेक करणे हानीकारक ठरू शकते. चहा, कॉफी, चॉकलेट, मीठ, साखर अशा सर्वच बाबतीत हे खरे आहे. दुधाला आपण पूर्णान्न म्हणतो व ते खरेच आहे; मात्र दुधाचे सेवनही योग्य मर्यादेतच करावे लागते अन्यथा त्याचेही दुष्परिणाम संभवतात, असे तज्ज्ञ सांगतात.
तज्ज्ञांच्या मते, तरुणांनी व ज्येष्ठांनी दररोज दोन ग्लास दूध प्यायले पाहिजे. त्यापेक्षा जास्त प्रमाणात दूध पिणे टाळावे. चहा, कॉफी आणि मिल्कशेकमध्येही दुधाची मात्रा याच्यापेक्षा जास्त नसावी. जर तुम्ही दही आणि पनीरचे सेवन करत असाल तर एक ग्लासच दूध प्यावे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार, दुधात प्रोटीन आणि व्हिटॅमिनसोबत फॅटदेखील असते. त्यामुळं शरीरात जास्त प्रमाणात फॅट जाते. ज्यामुळं हाय कोलेस्ट्रॉल, डायबिटीज आणि हृदयरोगाचा धोका उद्भवू शकतो. कोणतीही पौष्टिक गोष्ट असली तरी स्वास्थवर्धक जरी असली तरी जास्त प्रमाणात घेतल्यास हानिकारक ठरू शकते. दूधाचे अतिप्रमाणात सेवन केल्यास हाय कोलेस्ट्रॉलची समस्या उद्भवू शकते. कारण यात फॅट आणि कॅलरीची मात्रा अधिक असते. या दोघांच्या अत्याधिक सेवनाने शरीरातील एलडीएल म्हणजेच बॅड कॉलेस्ट्रॉलची मात्रा वाढते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. दुधामुळे हाडांना बळकटी मिळते. मात्र, अतिप्रमाणात दुधाचे सेवन केल्यास हाडांचे नुकसान होते. कारण यात डी-गॅलेक्टोज नावाची नैसर्गिक साखर असते. जे दुधात नैसर्गिकरित्या आढळली जाते आणि त्यामुळे हाडांचे नुकसान होते. परिणामी हाडें कमजोर होतात.
अतिप्रमाणात दूधाचे सेवन केल्यास ब्लड ग्लुकोजच्या मात्रेत वाढ होते. ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो. खासकरून फुल क्रीम दुधाच्या सेवनाने ब्लड शुगर वाढण्याचा धोका अधिक असतो. दुधात फॅटची मात्रा अधिक असते. हाय कॅलरीमुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे वेट लॉस करताना डेअरी प्रॉडक्ट आहारात सामील करु नका. दुधात असलेले फॅट लिव्हरलादेखील धोका पोहोचवू शकतात. त्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे अतिप्रमाणात दूध पिणे टाळावे.
हेही वाचा :