सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत बदल; शनिवारी १४ तास राहणार बंद | पुढारी

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत बदल; शनिवारी १४ तास राहणार बंद

बीड, पुढारी वृत्तसेवा : सराटे अंतरवाली येथे होत असलेल्या सभेच्या पार्श्‍वभूमीवर बीड जिल्हा पोलिस दलाने सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत बदल केला आहे. शनिवारी (दि.१४) सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत म्हणजेच सुमारे १४ तास सभेसाठी येणारी वाहने व शासकीय वाहने वगळून इतर वाहनांसाठी बीड-गेवराई-छत्रपती संभाजीनगर हा मार्ग बंद राहणार आहे. त्याऐवजी बीड-पाडळशिंगी-मादळमोही-खरवंडी-पाथर्डी- शेवगाव-पैठण-छत्रपती संभाजीनगर किंवा बीड-पाडळशिंगी-खरवंडी-पैठण -छत्रपती संभाजीनगर हा मार्ग वापरावा लागेल. तसेच बीड-गेवराई- जालना या मार्गाऐवजी बीड- ढी- माजलगाव-आष्टी-घनसांगवी-अंबड-जालना हा मार्ग वापरावा, असे आवाहन पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी केले आहे.

या सभेकरिता किमान पाच ते सहा लाख लोक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. यासाठी ३० ते ३५ हजार वाहने येतील. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ शकते. यामुळे हा बदल करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.

हेही वाचा : 

Back to top button