सोलापूर : टाकळी सिकंदर येथे आढळला अज्ञात मृतदेह | पुढारी

सोलापूर : टाकळी सिकंदर येथे आढळला अज्ञात मृतदेह

मोहोळ, पुढारी वृत्तसेवा : टाकळी सिकंदर येथे आढळला कुत्र्याने लचके तोडलेला अज्ञात मृतदेह आढळला आहे. याबाबत अकस्मात मयत म्हणून मोहोळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.  याबाबत मोहोळ पालिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर दिगंबर चव्हाण (वय 65 )हे नेहमीप्रमाणे शेतात पाणी सोडण्यासाठी गेले असता त्यांना कुत्रे काही तरी खात असल्याचे दिसले. त्यावेळेस बाजूच्या बबन चव्हाण यांच्या शेतात जाऊन सदर कुत्रे हे काय खात आहेत हे बघण्यासाठी जवळ गेले असता घाण वास येऊ लागला. त्यावेळेस त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता तेथे माणसाचे पुरुषचा मृतदेह दिसला. त्यावेळेस त्यांनी गावातील संतोष चव्हाण यांना सदर घटनेबाबत माहिती दिली असता त्यांनी आपण सदर घटने बाबत मोहोळ पोलिसांना कळवले.

हेही वाचलंत का?

 

Back to top button