सोलापूर : शरद पवार यांनी घेतली विजयसिंह मोहिते-पाटलांची भेट | पुढारी

सोलापूर : शरद पवार यांनी घेतली विजयसिंह मोहिते-पाटलांची भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी (दि.१३) अकलूज येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची भेट घेतली. शिवरत्न बंगल्यावर जात पवार यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. सुमारे २५ मिनिटांच्या या भेटीत त्यांनी शेती व शेती उत्पादनाविषयी चर्चा केली.

यावेळी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, बाबाराजे देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. सांगोला येथील कार्यक्रम आटोपून शरद पवार हे अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर आले. प्रदीर्घ काळानंतर शरद पवार अकलूज येथे आल्याने अनेकांना उत्सुकता निर्माण झाली होती.

हेही वाचंलत का?

Back to top button