छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यात २ लाख ४७ हजारांचा गांजा जप्त

छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यात २ लाख ४७ हजारांचा गांजा जप्त

पिशोर; पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील जवखेडा शिवारात ऊसात लागवड केलेल्या गांजाच्या शेतीवर पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी रामदास आबाराव भडगे (वय ७७) या शेतकऱ्यास ताब्यात घेत त्याच्याकडून २ लाख सत्तेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी, जवखेडा खुर्द शिवारातील रामदास भडगे या शेतकऱ्याने आपल्या शेतात उसाची लागवड केलेली असून त्यामध्ये गांजाची शेती करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोमल शिंदे यांनी पोलीस हवालदार सुनील भिवसाने, संजय दराडे, लालचंद नागलोत, पवन खबाट, कडुबा मस्के यांचे पथक तयार केले. व शनिवारी (दि.१२) सायकांळी गांजाच्या शेतीवर छापा टाकला. यावेळी २ लाख सत्तेचाळीस हजार ७१० रूपये किंमतीचा ओला गांजा जप्त करत पोलिसांनी भडगे याला ताब्यात घेतले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news