Lok sabha Election 2024 Results : मोहिते-पाटलांची विजयाकडे वाटचाल; १६ व्या फेरीत ६२ हजारांचे मताधिक्य | पुढारी

Lok sabha Election 2024 Results : मोहिते-पाटलांची विजयाकडे वाटचाल; १६ व्या फेरीत ६२ हजारांचे मताधिक्य

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी रामवाडी येथील शासकीय गोदामात मंगळवारी (दि.४) सकाळी नऊपासून मतमोजणी सुरू आहे. दरम्यान १६ व्या फेरीपर्यंत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मोठी मजल मारली आहे. त्यांनी तब्बल ६२ हजार ७३५ मतांची आघाडी घेऊन विजयाकडे वाटचाल केली आहे.

प्रारंभी टपाली मतदानात राष्ट्रवादीने आघाडी घेतली होती. ईव्हीएम मशीनची एक फेरी वगळता इतर १५ व्या फेरीमध्ये मोहिते पाटील यांनी मताधिक्य घेतले आहे. त्यामुळे जवळपास त्यांचा विजय निश्चित झाल्याची भावना मोहिते पाटील कार्यकर्त्यातून व्यक्त करण्यात येत आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते-पाटील हे मोठ्या मताधिक्याने आघाडीवर असल्यामुळे कार्यकर्त्यातून जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे. तसेच राहिलेल्या आठ फेऱ्यातही मोहिते-पाटील मोठ्या मताधिकेने विजयी होणार, असा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला होता.

हेही वाचा :

Back to top button