सोलापूर : उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धा; सांस्कृतिक कार्य विभागामार्फत होणार पारितोषिक वितरण | पुढारी

सोलापूर : उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धा; सांस्कृतिक कार्य विभागामार्फत होणार पारितोषिक वितरण

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात आला आहे. राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकास ५ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास २ लाख ५० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास १ लाख इतक्या रकमेचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकांच्या गणेशोत्सव मंडळास 25 हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

गत वर्षी उत्कृष्ट सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ स्पर्धेत जिल्हा स्तरावर सोलापूर च्या श्रीमंत मानाचा कसबा गणपती सार्वजनिक मंडळाला पारितोषिकाचा मान मिळाला होता.

शासन निर्णयातील परिशिष्टानुसार अर्जाचा नमुना पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्याmahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर ५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करणे अपेक्षित आहे. ८ सप्टेंबरपूर्वी अकादमीमार्फत जिल्हानिहाय अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात येतील. जिल्हास्तरीय विजेत्यांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात येईल. उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी अध्यक्ष, जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्ह्यातील पोलिस अधिकारी हे सदस्य असतील.

निकषांच्या आधारे पुरस्कारासाठी निवड

उत्कृष्ट सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ स्पर्धेसाठी एकूण १५० गुणांकन आहेत. पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूकर सजावट, ध्वनिप्रदूषणविरहित वातावरण, समाजप्रबोधनात्मक सजावट, देखावा, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सजावट, देखावा, मंडळामार्फत करण्यात येणारे सामाजिक कार्य, शैक्षणिक, आरोग्य आदीसंबंधी कार्य, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांना पुरविण्यात येणाऱ्या प्राथमिक सुविधा आदी निकषानुसार गुण देण्यात येतील.

हेही वाचा

Back to top button