Maharashtra NCP Crisis : सोलापूरच्या ‘राष्ट्रवादी’ नेत्यांचीही झाली विभागणी! | पुढारी

Maharashtra NCP Crisis : सोलापूरच्या ‘राष्ट्रवादी’ नेत्यांचीही झाली विभागणी!

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे, माजी महापौर यू. एन. बेरिया, तोफिक शेख, प्रमोद गायकवाड, सुधीर खरटमल हे शरद पवार यांच्या बाजूने गेले आहेत तर अजित पवार गटास संतोष पवार, जुबेर बागवान, उमेश पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान, बुधवारी मुंबईत पार पडलेल्या दोन्ही गटांच्या मेळाव्यास सोलापुरातून त्या त्या गटाच्या समर्थकांनी हजेरी लावली.

अजित पवार बंड करून भाजपसोबत गेल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. त्यापार्श्वभूमीवर सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसही दुभंगली. ज्येष्ठ नेते माजी महापौर मनोहर सपाटे, महेश गादेकर, शहर अध्यक्ष भारत जाधव हे सुरुवातीपासूनच शरद पवारांचे कट्टर समर्थक आहेत. त्याचबरोबर नव्याने आलेले तोफिक शेख, बेरिया, प्रमोद गायकवाड, महेश कोठे, नलिनी चंदेले यांनीही शरद पवारांना पाठिंबा दिला. मुंबईत झालेल्या शरद पवारांच्या मेळाव्यास या स्थानिक नेत्यांनी हजेरी लावली आहे.

अजित पवार समर्थकांनी भरली शपथपत्रे

अजित पवार गटाने घेतलेल्या मेळाव्यात हजेरी लावत सोलापूरचे नेते संतोष पवार यांनी सोलापुरातून आलेल्या युवक पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून शपथपत्र भरून घेतली.

Back to top button