सोलापूर : केके एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; सर्व प्रवासी सुखरूप | पुढारी

सोलापूर : केके एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; सर्व प्रवासी सुखरूप

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा सोलापूरहून दिल्लीच्या दिशेने जाणार्‍या गाडी क्र.12627 केके एक्सप्रेस या गाडीच्या इंजिनमध्ये सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट झाल्याने भीषण आग लागली. आग लागल्याचे रेल्वे चालकाच्या लक्षात येताच चालकाने सतर्कता दाखवत तात्काळ गाडी थांबवली. या घटनेत कोणतीही जीवित हाणी झाली नाही. परंतु, रेल्वे चालक मात्र आग विझविण्याच्या प्रयत्नात भाजला गेला आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, कर्नाटकहून सोलापुरात दाखल झालेली केके एक्सप्रेस दि.2 जुलै रोजी सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सोलापूरहून दिल्लीच्या दिशेने मार्गस्थ झाली. पुढे मोहोळ – मलीकपेठ या दरम्यान घाटणे परिसरात केके एक्सप्रेस पोहोचताच इंजिनमधून अचानक धूर बाहेर पडताना रेल्वे चालकाच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ याची माहिती कंट्रोल रूमला दिली. कंट्रोल रूमला माहिती मिळताच या मार्गावरील धावणाऱ्या इतर रेल्वे नजिकच्या स्थानकात थांबवण्यात आल्‍या.

रेल्वे चालक आग विझविण्याचा प्रयत्नात भाजला गेल्याने त्यास मोहोळ येथे उपचारासाठी दाखल केल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. रेल्वे चालकाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. यात कोणतीही जीवितहाणी झाली नाही. इंजिन पाठीमागील जनरल डब्यातील प्रवाशांना खाली उतरवल्याने सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकार्‍याने दिली.

हेही वाचा : 

Back to top button