Teesta Setalwad : तिस्ता सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तूर्त दिलासा

Teesta Setalwad : तिस्ता सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तूर्त दिलासा
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाने तूर्त दिलास देत शरणागतीस सात दिवसांची मुदतवाढ दिली. शनिवारी रात्री उशिरा तीन सदस्यीय खंडपीठापुढे सेटलवाड यांच्या जामिनावर सुनावणी झाली.

दरम्यान, सेटलवाड यांच्या जामिनावरून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमध्ये मतभिन्नता झाली होती. त्यामुळे त्यांच्या जामिनाबाबत वरिष्ठ खंडपीठासमोर सुनावणी झाली. गुजरात उच्च न्यायालयाने सेटलवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यांना त्वरित शरण येण्याचे आदेश दिले होते. यानंतर सेटलवाड यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता झाली होती. या पार्श्वभूमीवर सेटलवाड यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्जावर त्वरित सुनावणी घेण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय एस ओका आणि न्यायमूर्ती प्रशांतकुमार मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सेटलवाड यांना जामीन मंजूर करावा, असे मत ओका यांनी व्यक्त केले. मिश्रा यांनी मात्र याला विरोध दर्शविला. दोन सदस्यीय खंडपीठ यावर निर्णय घेऊ शकत नसल्याचे स्पष्ट करीत या दोन्ही न्यायाधीशांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडे प्रकरण वरिष्ठ न्यायालयाकडे सोपविण्याची विनंती केली. त्यानंतर तीनसदस्यीय खंडपीठापुढे रात्री सुनावणी झाली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news