Violence in Manipur : मणिपूरमध्ये हिंसाचार का भडकला? मुख्यमंत्री बिरेन सिंग दिले उत्तर… | पुढारी

Violence in Manipur : मणिपूरमध्ये हिंसाचार का भडकला? मुख्यमंत्री बिरेन सिंग दिले उत्तर...

पुढारी ऑनलाईन : मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचार भडकला आहे. दरम्यान, मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी हा हिंसाचार पुर्वनियोजित असू शकतो. या हिंसाचारामागे ‘परकीय हात’ असल्याचे संकेत दिले. मणिपूरमधील पहाडी जिल्ह्यांमध्ये शनिवारी (दि. १ जून) एका ‘आदिवासी एकता मार्च’ला (Violence in Manipur) संबोधित करताना ते बोलत होते.

या वेळी बिरेन सिंग म्हणाले की, “मणिपूरमध्ये ३ मे पासून राज्यात हिंसाचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या हिंसाचारामागे बाह्यशक्तींचा हात असल्याची शक्यता आहे. येथील वांशिक संघर्षात बाह्य घटकांचा हात असू शकतो आणि ते “पूर्वनियोजित” देखील असू शकते.”

मणिपूरची सीमा म्यानमारशी आहे. चीनही जवळ आहे. मणिपूरच्या 398 किमीच्या सीमा या अद्याप असुरक्षित आहेत. मणिपूरच्या सीमेवर सुरक्षा दल तैनात आहेत, परंतु एक मजबूत आणि व्यापक सुरक्षा तैनाती एवढ्या मोठ्या क्षेत्राला व्यापू शकत नाही. त्यामुळे मणिपूरमध्ये जे घडत आहे ते पाहता, आम्ही हे नाकारू शकत नाही  किंवा याची पुष्टीही करू शकत नाही; पण राज्‍यात घडलेला हे पूर्वनियोजित दिसते (Violence in Manipur) यामागचे कारण स्पष्ट नाही, असेही एन बिरेन सिंग म्हणाले.

Violence in Manipur: राहुल गांधींचा मणिपूर दौरा हा ‘राजकीय अजेंडा’

एन बिरेन सिंग म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकार राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. सरकारने मणिपूरमधील ‘कुकी बंधू आणि भगिनींशी’ दूरध्वनीवरून संवाद साधला असून, चला क्षमा करूया आणि विसरूया, असा सल्ला देखील दिला आहे.  दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मणिपूर दाैरा हा राजकीय अजेंडा असल्याची टीकाही एन.बिरेन सिंग यांनी केली.

हेही वाचा:

 

Back to top button