खांडजला भारतीय हवाई दलाच्या हेलिकाॅप्टरचे इमर्जन्सी लॅंडींग
बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील खांडज गावच्या शिवारात हनुमंत ज्ञानदेव आटोळे यांच्या शेतामध्ये भारतीय हवाई दलाच्या चेतक या हेलिकाॅप्टरचे इमर्जन्सी लॅंडींग करण्यात आले. यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. सोलापूरच्या दिशेने हे हेलिकाॅप्टर निघाले होते. परंतु हेलिकाॅप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचे इमर्जन्सी लॅंडींग खांडजजवळ एका शेतात करण्यात आले.
सकाळी साडे दहाच्या सुमारास हे हेलिकाॅप्टर शेतात उतरविण्यात आले. गेल्या काही महिन्यांपूर्वी शिकाऊ पायलटकडून इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे तातडीने विमान उतरविण्यात आले होते. त्याच प्रकारचे या हेलिकाॅप्टरचे लॅंडींग झाले. अचानक शेतात ते उतरल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते. परंतु तांत्रिक बिघाडामुळे ते उतरविण्यात आले असून दुरुस्तीनंतर ते पुन्हा सोलापूरकडे रवाना होईल अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.