आंतरभारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी गोव्याचे पांडुरंग नाडकर्णी यांची निवड | पुढारी

आंतरभारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी गोव्याचे पांडुरंग नाडकर्णी यांची निवड

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : आंतरभारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी गोव्याचे पांडुरंग नाडकर्णी, कार्याध्यक्षपदी आंबाजोगाईचे अमर हबीब तर कोषाध्यक्षपदी सोलापूरचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत चनशेट्टी यांची निवड करण्यात आली आहे. प्राचार्य सदाविजय आर्य यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन आंतरभारतीच्या विश्वस्त मंडळाने पदाधिकाऱ्यांची निवड केली. राष्ट्रीय उपाध्यक्ष (महिला) संगीता देशमुख (वसमत), सचिव डॉ. डी. एस. कोरे (पुणे) व कोषाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी (सोलापूर) यांची निवड करण्यात आली.

आंतरभारतीची स्थापना साने गुरुजी यांनी केली. ही संस्था राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्य करते. प्राचार्य सदाविजय आर्य या संस्थेचे अध्यक्ष होते. १७ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांचे आकस्मित निधन झाले. त्यामुळे नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

पांडुरंग नाडकर्णी शिक्षण क्षेत्रातील जाणकार असून, त्यांनी गोव्यात कथामालेचे कार्य केले आहे. १९७५ पासून ते आंतरभारतीशी जोडले गेले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button