सोलापूर : भरधाव ट्रॅव्हल्स पलटी होऊन चालक ठार; सहा जखमी | पुढारी

सोलापूर : भरधाव ट्रॅव्हल्स पलटी होऊन चालक ठार; सहा जखमी

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने उड्डाणपुलाच्या डिव्हायडरवर गाडी आदळून पलटी झाली. या अपघातात (५३ वर्षीय) चालकाचा मृत्यू झाला. सहा प्रवासी जखमी झाले. ही घटना सोलापूर-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील लिंबीचिंचोळी (ता. दक्षिण सोलापूर) येथे आज (सोमवार) पहाटे घडली.

या विषयी अधिक माहिती अशी की, ट्रॅव्हल्स मुंबईहून/शहापूर (कर्नाटक) येथे प्रवासी घेऊन चालली होती. लिंबीचिंचोळीच्या पुलावर गाडी येताच चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी डिव्हायडरवर आदळली. यामुळे गाडी पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाला. यावेळी ट्रॅव्हल्समधील सहा प्रवासी जखमी झाले. या ट्रॅव्हल्समध्ये तीसहून अधिक प्रवासी मुंबईहून शहापूरकडे प्रवास करत होते.

महंमद नाशीर अहमद मैनुद्दीन (वय ५३, रा. मजबुरी, नायमुल्ला, कलबुर्गी असे मरण पावलेल्या चालकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरवसे, जमादार, राठोड या पोलिसांच्या पथकाने बचावाची कामगिरी केली. जखमींना तात्काळ सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सहाही प्रवाशांची प्रकृती स्‍थिर असून, त्यांना घरी सोडण्यात आसल्याचे एएसआय धनसिंग राठोड यांनी सांगितले.

हेही वाचा :  

Back to top button