इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आमदार लंके | पुढारी

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आमदार लंके

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात सुरू केलेल्या कोविड सेंटरमधील आयुर्वेदिक क्षेत्रातील योगदानाबद्दल रविवारी (दि.11) आमदार नीलेश लंके यांना नवी दिल्ली येथे आहार तज्ज्ञ व आयुर्वेदाचार्य डॉ. बिस्वरूप रॉय चौधरी यांच्या हस्ते ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले.  व्हीएतनाम रेकॉर्ड संघटनेचे सदस्य असलेल्या देशांबरोबर ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ संस्थेकडून दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

या कार्यक्रमास भारतासह नेपाळ, बांग्लादेश, व्हीएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, ब्रिटन, अमेरिका, या देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या आठ देशांतील रेकॉर्ड धारकांना ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये सन्मानित होण्याची संधी मिळते. 2021मध्ये कोविड काळात सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये डॉ. बिस्वरुपरॉय चौधरी व ‘एनआसीई’ (इन्फ्लुएंझा केअर तज्ज्ञांचे नेटवर्क) यांच्या सहकार्‍याने देशातील पहिले नॅचरोपॅथी कोविड सेंटर सुरू केले होते. यामध्ये कोणत्याही औषधांशिवाय कोरोना रुग्णांवर यशस्वी नैसर्गिक उपचार केले होते. या सन्मानाबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, व्हीएतनाम रेकॉर्ड संघटनेचा व त्यांच्या सदस्य राष्ट्रांच्या बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेचे त्यांनी आभारी मानले.

Back to top button