पुढारी ऑनलाइन डेस्क : भारतीय लष्कराच्या कौशल्याची प्रचिती आपल्या येत असते. भारतीय संरक्षण दलांच्या आणखी एका ठळक वैशिष्ट्यात भारतीय सैन्याचे प्रभावी अभियांत्रिकी कौशल्य रविवारी समोर आले जेव्हा एका व्हिडिओमध्ये सैन्याने सिंधू नदीवर पूल बांधताना चित्रण केले. 'ब्रिजिंग चॅलेंजेस – नो टेरेन नॉर अल्टिट्यूड इन्सर्माउटेबल' असे या व्हिडिओचे शीर्षक असून, तो भारतीय लष्कराच्या दक्षिण पश्चिम कमांडने ट्विटरवर शेअर केलाआहे. पूर्व लडाखमध्ये सप्त शक्ती अभियंत्यांनी ही कवायत केली. यामध्ये मोबिलिटी टास्क आणि प्रशिक्षण समाविष्ट होते.
Indian Army "आव्हाने पूर्ण करणे – भूप्रदेश किंवा उंची असुरक्षित नाही'. पूर्व लडाखमधील सप्तशक्ती अभियंते गतिशीलता कार्ये आणि प्रशिक्षण घेत आहेत. बलाढ्य #सिंधू नदीला ब्रिजिंग करून, लढाऊ आणि लॉजिस्टिक दोन्ही मार्गांची हालचाल सक्षम करते," असे ट्विट भारतीय लष्कराच्या दक्षिण पश्चिम कमांडने केले आहे.
व्हिडिओमध्ये हेवी मेटल पार्ट्स नदीपात्रात एका पाठोपाठ एक सोडून देण्यात आले. नंतर ते जोडून त्याचा सिंधू नदीवर पूल बनवण्यात आला. अतिशय थोड्या वेळात हा पूल पूर्ण झाला. हा पूल व्यवस्थित जोडल्यानंतर या पूलावरून सैन्याचे चार मोठ मोठे ट्रक आरामात यावरून धावले, असे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. यामध्ये ट्रकमधून हेवी मेटल पार्ट्स नदीत सोडणे ते उघडणे त्यांना व्यवस्थित जोडणे आदी सैन्याचे Indian Army कौशल्य दिसून येत आहे.
लडाख सारख्या दुर्गम भागात सिंधू नदीवर अशी कवायत म्हणजे एक दिव्यच आहे. व्हिडिओमध्ये सैनिकांची तत्परता, काम करण्याचा वेग, इत्यादी गोष्टी आपले लक्ष वेधून घेतात. भारतीय सैन्य फक्त युद्धातच नाही तर अन्य अनेक बाबतीत शिस्तप्रिय आणि कुशल पद्धतीने कार्य करते. याची प्रचिती पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर येते.
हेहीवाचा