सोलापूर: गणेश मुर्तीचे दगड खाणीत विधिवत विसर्जन! | पुढारी

सोलापूर: गणेश मुर्तीचे दगड खाणीत विधिवत विसर्जन!

सोलापूर, वृत्‍तसेवा : साेलापूर महापालिका प्रशासनाकडून पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या आवाहनाला अनेक गणेशोत्सव मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्यावतीने आपल्या तीन फुटावरील मोठ्या गणेश मुर्तीचे विसर्जन तुळजापूर रोड येथील दगड खाणीत केले.

श्री गणेश विसर्जनासाठी शुक्रवारी महापालिका प्रशासनाकडून तुळजापूर रोड येथील दगड खाणीत व्यवस्था करण्यात आली. सकाळी महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप , पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर , नगर अभियंता संदीप कारंजे, उपअभियंता एस.एम.आवताडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत संकलीत केलेल्या बाप्पाच्या मुर्तीची विधीवत आरती करण्यात आली. विधीवत बाप्पाची पुजा झाल्या नंतर “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” च्या जय घोष करण्यात आला. क्रेनच्या सहाय्याने दगडखाणीत उतरून बाप्पाची मुर्तीचे मनोभावे विसर्जन करण्यात आले.

शहरात पर्यावरण पूरक श्रीगणेश विसर्जन करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आवाहनाला प्रतिसाद दिला. इतरही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी मोठ्या मूर्त्या पालिका प्रशासनाकडे सुपूर्द करावेत असे आवाहनही पालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी केले.

दरम्यान, पालिका आयुक्तांनी केलेल्या आवाहनाला विसर्जनाच्या दिवशी सार्वजनिक मंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दगडखाणीवर पहावयास मिळाले यावेळी कोणताही जिवितहानी होऊ नये म्हणून जीवरक्षकासह पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अशी आहे व्यवस्था!

विसर्जन खाण ही तुळजापूर रोडला असून विधिवत पूजा करून विसर्जन करण्यात येत आहे. या ठिकाणी महापालिकेचे 30 कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पथक दोन शिफ्ट मध्ये तैनात राहणार आहेत. सुमारे सात अभियंतेही उपस्थित होते. सकाळी 9 ते 5 व सायंकाळी 5 ते रात्री 12 पर्यंत या दोन शिफ्ट मध्ये कर्मचारी कार्यरत आहेत. दोन क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतुकीसाठी 70 गाड्या तैनात आहेत तसेच महापालिकेचे 600 कर्मचारी कार्यरत आहेत. त्याचबरोबर मक्तेदाराकडून 400 कामगार आहेत.

हेही वाचा

उत्तराखंड : ऋषिकेश-बद्रीनाथ मार्गावर भाविकांची कार दरीत कोसळली, महाराष्ट्रातील चार भाविकांनी गमावला जीव

‘सायरस मिस्त्रींची कार 100 किमी प्रति तास वेगाने धावत होती, तेव्हाच … ‘, मर्सिडीजच्या अहवालात खुलासा

दिलासादायक बातमी: हिसारमध्ये लम्पी व्हायरसची लस तयार, लवकरच देशभर जनावरांचे लसीकरण

Back to top button