सोलापूर : रेल्वे स्थानकावर आरक्षकाच्या तत्परतेमुळे तरुणीचा वाचला जीव | पुढारी

सोलापूर : रेल्वे स्थानकावर आरक्षकाच्या तत्परतेमुळे तरुणीचा वाचला जीव

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक चारवर धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात तरुणी पाय घसरून फलाट व रेल्वेमधील गॅपमध्ये अडकली. दरम्यान, फलाटवर कर्तव्य बजावणाऱ्या आरक्षकाच्या धाडस व तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि तरुणीचा जीव वाचला.

याबाबत रेल्वे सुरक्षा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर स्थानकातील फलाट क्रमांक चारवरून कोईमतूरकडे लोकमान्य टिळक- कोईमतुर एक्सप्रेस निघाली होती. या गाडीत चढताना अदिती महेश पांढरे (वय २१, रा. श्रेयश अपार्टमेंट, सात रास्ता, सोलापूर) या तरुणीचा पाय घसरला आणि ती फलाट व रेल्वेमधील गॅपमध्ये अडकणार इतक्यात आरक्षक सतीश पोटभरे व पी. एस. सी. त्रिपाठी यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता गॅपमध्ये अडकणाऱ्या तरुणीला सुखरूप बाहेर काढले. आरक्षकाच्या तत्परता व धाडसाचे रेल्वे स्थानकातील सर्वांनी कौतुक केले.

रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वारंवार सूचना देण्यात येते. धावत्या रेल्वेत प्रवाशांनी चढू अथवा उतरू नये. तरी देखील प्रवासी या सूचनेकडे दुर्लक्ष करतात. हे अत्यंत चुकीचे आहे.
-श्रेयांश चिंचवाडे, विभागीय रेल्वे सुरक्षा आयुक्त, सोलापूर

हेही वाचलंत का ? 

Back to top button